VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 2 June 2022

| Updated on: Jun 02, 2022 | 2:30 PM

जीएसटीची आकडेवारी अजित पवार यांनी सादर केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मार्च 2022पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राज्यांची 21 राज्यांची 86 हजार 912 कोटी रक्कम रिलीज केली. राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून येणे असणारी रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे.

जीएसटीची आकडेवारी अजित पवार यांनी सादर केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मार्च 2022पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राज्यांची 21 राज्यांची 86 हजार 912 कोटी रक्कम रिलीज केली. राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून येणे असणारी रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे. जेव्हा जीएसटी आला त्यावेळी असे सांगण्यात आले होते, की मार्च 2022पर्यंत कमी पडणारी रक्कम राज्यांना दिली जाईल. त्यानुसार 15 हजार 502 कोटी आपल्याला येणे बाकी आहे. ती रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाईल. त्याचा विकासकामांसाठी वापर करता येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Published on: Jun 02, 2022 02:30 PM
Sonia Gandhi : मोठी बातमी! सोनिया गांधींना कोरोनाची लागण, अन्य काही नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण
VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 02 June 2022