Raigad Irshalwadi Landslide | खालापूरच्या इर्शालवाडीत मोठी दुर्घटना, दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू

Raigad Irshalwadi Landslide | खालापूरच्या इर्शालवाडीत मोठी दुर्घटना, दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 20, 2023 | 10:40 AM

याचदरम्यान या घटनेतून २५ हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले असून सततचा पाऊस आणि रस्ता नसल्याने बचावकार्यात आडथळा येत आहे.

रायगड, 20 जुलै 2023 | रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत खालापूरच्या इर्शालगडवाडीतील सुमारे ६० ते ७० कुटुंब गाडली गेल्याची भीती असून २०० नागरीक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या येथे बचावकार्य जोरात सुरू असून याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडकडे रवाना झाले आहेत. तर मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि वचाव कार्य वाढवले आहे. याचदरम्यान या घटनेतून २५ हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले असून सततचा पाऊस आणि रस्ता नसल्याने बचावकार्यात आडथळा येत आहे. तर आता पर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  तर अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून
8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

Published on: Jul 20, 2023 09:45 AM