Solapur School Start | सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू

Solapur School Start | सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू

| Updated on: Jun 15, 2022 | 12:40 PM

गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण 3 लाख विद्यार्थी शाळेत हजर राहतील हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. दोन वर्षानंतर आज पहिल्यांदा कोरोनामुक्त वातावरणात शाळा सुरू झाली आहे. सोलापुरातील संभाजीराव शिंदे प्रशालेत मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती यावेळी दिसली.  जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 10 हजार शिक्षक आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत हजर होते. विद्यार्थ्यांची ओवाळणी करत गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण 3 लाख विद्यार्थी शाळेत हजर राहतील हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

 

Published on: Jun 15, 2022 12:40 PM