ठाकरे गटाच्या बैठकीला 4 ते 5 माजी नगरसेवक गैरहजर; सत्ताधाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत ठाकरे गटाच्या गटातील चार ते पाच माजी नगरसेवक गैरहजर असल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे.शिंदे गटात इनकमिंग वाढल्या असल्याने माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती.
मुंबई : दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत ठाकरे गटाच्या गटातील चार ते पाच माजी नगरसेवक गैरहजर असल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे.शिंदे गटात इनकमिंग वाढल्या असल्याने माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. गैरहजर असलेल्यांमध्ये माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचा देखील समावेश होता.चेंबूरकरांनी तब्येत ठीक नसल्याने ते या बैठकीत गैरहजर असल्याचे कारण सांगितले. मात्र हे आजारपण आहे का तपासा असा टोला, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे, तर ठाकरे यांच्या स्टेजवर चारचं लोकं उरतील असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला आहे.
Published on: Jun 21, 2023 01:28 PM
Latest Videos