Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले

Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले

| Updated on: Mar 02, 2024 | 8:46 PM

लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपाने देशपातळीवरील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रातील यादीवर सस्पेन्स ठेवला आहे. तर महाराष्ट्रातील विरोधक महाविकास आघाडीच्या जवळपास 48 पैकी 42 उमेदवारांच्या नावावर एकमत झाल्याची माहीती टीव्ही 9 मराठीकडे आली आहे.

मुंबई | 2 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपाने आपली देशभरातील 195 उमेदवारांची यादी जाहीर करीत आघाडी घेतली आहे. मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांवर अजून निर्णय घेतलेला नाही. तर महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवारांची नावांवर मात्र जवळपास एकमत झाल्याची माहीती टीव्ही 9 मराठीकडे आली आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा ठाकरे गट लढविणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. कल्याण लोकसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांना उभे करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु आहे. तर ठाणे येथून राजन विचारे, मुंबई-दक्षिण येथून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण-मध्य येथून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, पालघरमधून भारती कामडी यांच्यानावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे, नाशिक येथून विजय करंजकर, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून विनायक राऊत, मावळ मधून संजोग वाघेरे, बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. वाशिम-यवतमाळ- संजय देशमुख, परभणी- संजय जाधव, शिर्डी-भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिव-ओमराजे निंबाळकर, जळगाव-हर्षल माने, हिंगोली-नागेश आष्टिकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Published on: Mar 02, 2024 08:45 PM