SuperFast News | नागपूरमधील प्रवास आता गारेगार होणार; 40 इलेक्ट्रिक बस दाखल

SuperFast News | नागपूरमधील प्रवास आता गारेगार होणार; 40 इलेक्ट्रिक बस दाखल

| Updated on: Mar 20, 2023 | 8:47 AM

नागपूरमधील प्रवशांचा प्रवास आता गारेगार होणार असून नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये 40 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. याचबरोबर लवकर 250 बस सहभागी होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे

सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसेच कोकणात समृद्धी महामार्गाप्रमाणे ग्रिनफिल्ड महामार्ग तर किनारी भागांना जोडणारा कोस्टल महामार्ग तयार करण्यात असल्याचे देखील जाहीर केलं. नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडून इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण. फडणवीस आणि गडकरींचा बसमधून एकत्रित प्रवास प्रवास. तर नागपूरमधील प्रवशांचा प्रवास आता गारेगार होणार असून नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये 40 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. याचबरोबर लवकर 250 बस सहभागी होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे.

राज्यात अपूऱ्या एसटी बस गाड्यांमुळे प्रवाशांना फटका बसत आहे. राज्यातील बस गाड्यांची संख्या 18000 वरून 13000 वर आली आहे. यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. तर राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील 5000 पदांच्या कंत्राटी भरतीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आरोग्य सेवेची संबंधित महत्त्वाच्या तांत्रिक सदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील अत्यावश्यक सेवांचा खोळांबा होत असला तरिही कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7 दिवस असून नांदेडमध्ये आंदोलन स्थळी अशोक चव्हाण यांनी भेट दिली. तसेच आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहिर केले.

Published on: Mar 20, 2023 08:47 AM