Pune TOP 9 News | दहा दिवसातच आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 56 हजार अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रियातर्गत जिल्ह्यामध्ये 936 शाळांमध्ये 15600 जागा उपलब्ध आहेत. मात्र सुरुवातीच्या दहा दिवसातच आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 56 हजार अर्ज आले आहेत
पुणे : पुण्यामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला एक मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियातर्गत जिल्ह्यामध्ये 936 शाळांमध्ये 15600 जागा उपलब्ध आहेत. मात्र सुरुवातीच्या दहा दिवसातच आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 56 हजार अर्ज आले आहेत. तर औषधांच्या वाहतुकीच्या नावाखाली अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई सोमाटणे येथील टोल नाक्याजवळ करत बेंच कंपनीचा दहा चाकी कंटेनर जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तर 1मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. तर पुण्यातील एका तरूणीला 14 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून गिफ्ट पाठवायचे आहे म्हणत हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अनोळखी खातेधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे.