2018च्या TET परीक्षेत अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेत पात्र केल्याचा गैरव्यवहार उघडकीस
हाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणीची( TET exam scam ) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी (cyber Police) जप्त केली आहेत.
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणीची( TET exam scam ) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी (cyber Police) जप्त केली आहेत. तर राज्य परीक्षा परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा राज्य परीक्षा परिषदेला मिळाला आहे. आतापर्यंत 2019-20 च्या परिक्षेतली 400 तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. जी ए सॉफ्टवेअर कडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police )दिली आहे.