मनोज जरांगे यांच्या सभेसाठी 7 कोटी, शिकण्यासारखे आहे, भुजबळांनी लगावला टोला

मनोज जरांगे यांच्या सभेसाठी 7 कोटी, शिकण्यासारखे आहे, भुजबळांनी लगावला टोला

| Updated on: Oct 12, 2023 | 8:06 PM

'ओबीसीमध्ये vjnt आहे. आता केवळ १७ टक्के आरक्षण आहे आणि पावणे चारशे जाती आहे. मराठा समाज आल्यावर त्यांनाही काही मिळणार नाही आणि यांनाही काही मिळणार नाही. मराठा समाजाला वेगळं टिकणारे आरक्षण द्या. ओबीसीमध्ये दिलं तर त्यांना नाही, यांना नाही असं होईल', असे भुजबळ म्हणाले.

नाशिक : 12 ऑक्टोबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या सभा होत आहेत. आता त्यांची सभा १०० एकर जमिनीवर होणार आहे. ही सभा घेण्यासाठी किमान सात ते आठ कोटी रुपये लागतील. आपण एवढं काम करतो. पण, एका कार्यक्रमासाठी सात, आठ लाख रुपये जमवू शकत नाही. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धनसुद्धा लागतं. त्यामुळे हे सगळं त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. त्याचा अर्थ मी काही टीका वगैरे केली नाही. कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. आवश्यक वाटलं तर आपणही रॅली काढू, पण. त्यासाठी खिशात हात घातला पाहिजे, आश्रःई त्यांनी स्पष्ट केले. आपला पूर्ण पाठिंबा मराठा समाजाच्या आरक्षणाला आहे. त्यांनी (मनोज जरांगे पाटील) कुठून आकडे आणले मला माहित नाही. मंडल आयोगाने म्हटलं की, देशात सर्वसाधारणपणे ५४ टक्के संख्या आहे आणि त्यासाठी २७ टक्के आरक्षण देण्यात यावे. ना मी आरक्षणात शिकलो, ना माझी मुलं आरक्षणात शिकले, असे भुजबळ म्हणाले.

Published on: Oct 12, 2023 08:06 PM