Special Report | एकनाथ शिंदे यांचे 8-10 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात?  कोण आहेत 'ते' आमदार?

Special Report | एकनाथ शिंदे यांचे 8-10 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? कोण आहेत ‘ते’ आमदार?

| Updated on: Jul 07, 2023 | 1:17 PM

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी झाली आहे. अजित पवारांमुळे मंत्रिपदावरून शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार यांनी धक्कादायक दावा केला आहे.

मुंबई: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी झाली आहे. अजित पवारांमुळे मंत्रिपदावरून शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार यांनी धक्कादायक दावा केला आहे. “शिंदे गटाच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा” दावा त्यांनी केला आहे. विनायक राऊत यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. “तर विनायक राऊत हवेत तीर मारतात, त्यांनी एका तरी आमदाराचं नाव सांगा,” असं शिंदे गटाने म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका न करणाऱ्या आमदारांना पुन्हा येण्यास इच्छुक असल्यास परत घेण्यास उद्दव ठाकरेंची तयारी आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटात खरंच अशी खलबतं सुरु आहेत का? यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 07, 2023 01:17 PM