PM Modi | देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, कोरोनामुळे मोदी सरकारचा निर्णय

| Updated on: Apr 23, 2021 | 7:50 PM

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. (80 crore people in the country will get free foodgrains, Modi government's decision due to corona)

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची ( Corona pandemic) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बहुतांश राज्यांनी रात्रीची संचारबंदी तसेच लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशातील जवळपास 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत राशन दिले जाणार आहे.