परभणी, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात आंदोलनं सुरू आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकार घेत नसल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसताय. यामध्ये मराठा आरक्षण मिळावे यासाठाी लहानग्यांपासून थेट वृद्धमंडळींचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ८५ वर्षांच्या आजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये त्यांनी सरकारला धारेवरच धरल्याचे दिसतंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील कृशेवर्ता ढोणे असं आजीबाईचं ना असून त्या म्हणताय. “आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे, आमचे लेकरं रोडवर हिंडायलेत. आम्ही गरिबीतून शिकलोय, आम्ही मजुरी करून आमच्या लेकरांना शिकवलंय. आमच्या लेकरांना का देत नाही तुम्ही आरक्षण? या तुम्ही रस्त्यावर मी तुम्हाला चप्पलेने हाणते. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे, का देत नाही तुम्ही आम्हाला आरक्षण?”