चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, ‘साहेब मला माफ करा’

चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, ‘साहेब मला माफ करा’

| Updated on: Jan 09, 2023 | 9:40 AM

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरून कायमचं राजकारण पाहायला मिळतं. आताही या स्मृतिस्थळावरून राजकारण पेटलं आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व:तची वेगळी चूल मांडत सत्तेची चावी आपल्याकडे घेतली. याची चर्चा राज्यासह देशभर झाली आणि आजही त्याची होताना दिसते. मात्र आताही चर्चा एका वेगळ्याचं कारणानं होतं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरून कायमचं राजकारण पाहायला मिळतं. आताही या स्मृतिस्थळावरून राजकारण पेटलं आहे. तर या स्मृतिस्थळावर ‘साहेब मला माफ करा’ आशा अशयाचे एक मोठे बॅनर एका शिवसैनिकाकडून लावण्यात आले आहे. ज्याचीच चर्चा राज्यभर होताना दिसत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे टक्केवारी मागितली म्हणून येथे चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, असा आरोप या बॅनरमधून केला आहे. ‘साहेब मला माफ करा’ अशा अशयाचे एक मोठे बॅनर येथे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा बॅनर या परिसरातील सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिकेच्या भ्रष्टाचारावर शिवसैनिक राजेश चिंदरकर यांनी हा नवा आरोप केला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ बॅनर उभारून महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ‘साहेब मला माफ करा’ चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही असे म्हटलं आहे

Published on: Jan 09, 2023 08:59 AM