पवार गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, महिलांना डावललं जातंय, कुणी केला आरोप?
जिल्हा कार्यकारिणी बॅनरवर महिला जिल्हा अध्यक्ष यांचा फोटो नसल्याने कार्यकर्त्यांनी विचारणा केली. यामुळे गोंधळ झाला. महिलांबाबत डावला डावलीचे राजकारण होत असल्याचा आरोप महिलांनी केला.
चिपळूण : 10 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी १९९३ मध्ये मुख्यमंत्री असताना राज्यात महिला आयोग स्थापन केला. महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू करण्याचाही निर्णय घेतला. महिलांसाठी विविध योजना आणणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातच महिलांना डावललं जातंय. पक्षातील ही अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलीय. रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केलीय. जिल्हा मेळाव्याच्या मुख्य बॅनरवर चित्रा चव्हाण यांना डावललं गेल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. भास्कर जाधव, आमदार शेखर निकम ते आता रमेश कदम यांचे राजकारण डावला डावलीचे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी आहोत. राष्ट्रवादी पक्ष हे पवार साहेब यांचे कुटुंबं आहे. आपल्याला हे पद सुप्रियाताई सुळे यांनी दिलं आहे, असेही त्या म्हणाल्यात.