Solapur : महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापुरात एमआयएमला धक्का, 6 नगरसेवक जाणार राष्ट्रवादीत
नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांच्या उपस्थितीत आहे. यामुळे सोलापुरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यताय.
सोलापूर : राज्यात महापालिका निवडणुकीची (Corporation) तयारी सुरू आहे. त्यातच इच्छुक उमेदवार आपल्या वॉर्डमध्ये मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करताय. तर तिकीट मिळवण्यासाठी देखील रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. यातच आता पक्षप्रवेशाच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. महापालिका समोर ठेवून हे डावपेच आखले जात असल्याची चर्चा आहे, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असतानाच एमआयएम या पक्षाला (MIM) मोठं खिंडार पडलं आहे. सोलापुरातील एमआयएमचे तब्बल सहा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे सोलापुरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 12, 2022 10:13 AM
Latest Videos