Nagpur | नागपूरमधील व्यावसायिकाची कारमध्ये स्वत: ला जाळून घेत आत्महत्या
नेमकं काय कारण होतं याचाही तपास घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरमध्ये अशा अनेक घटना घडत असतात.
मुंबई – नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना आली उजेडात आली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे. त्याने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते त्यातून बचावले. आगीत व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रामराज गोपाळकृष्ण भट असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे. आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी घरच्यांची चौकशी सुरु केली आहे. नेमकं काय कारण होतं याचाही तपास घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरमध्ये अशा अनेक घटना घडत असतात.
Published on: Jul 20, 2022 10:59 AM
Latest Videos