मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात काल अनावधानाने कार घुसली ; तरी आमचा तपास सुरु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कुठेही कमतरता नाही . संबंधित घटनेचा तपास करण्यात आला असून ही घटना अनावधाने घडलेली आहे. याबाबत पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेच्या बाबतीत कुठे दिरंगाई झाली का याच तपास आम्ही करत आहोत.
मुंबई – मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यात अचानक कार घुसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात काल अनावधानाने कार घुसली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कुठेही कमतरता नाही . संबंधित घटनेचा तपास करण्यात आला असून ही घटना अनावधाने घडलेली आहे. याबाबत पोलीस यंत्रणेकडून(Police) सुरक्षेच्या बाबतीत कुठे दिरंगाई झाली का याच तपास आम्ही करत आहोत. मात्र घटनेला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही करणार ही घटना अनावधाने घडली होती. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.
Published on: Jun 18, 2022 04:25 PM
Latest Videos