कुपंनच शेत खातं; रूग्णांनी जायचं कुठं? कमिशनसाठी रूग्णांची फसवणूक? 11 जणांना अटक
एकीकडे आरोग्य सुविधा चांगल्या आणि माफक दरात मिळतात म्हणून ग्रामिण भागातील अनेक रूग्ण हे मुंबईकडे येत असतात. मात्र त्यांच्या या भाभडे पणाचा आता गैर फायदा घेतला जात असल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | जेव्हा कुंपनच शेत खातं तर मग कोणाला काय दोष द्यायचा. एकीकडे आरोग्य सुविधा चांगल्या आणि माफक दरात मिळतात म्हणून ग्रामिण भागातील अनेक रूग्ण हे मुंबईकडे येत असतात. मात्र त्यांच्या या भाभडे पणाचा आता गैर फायदा घेतला जात असल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. तर येथे कमिशनसाठी रूग्णांना वेठीस धरणं जात असल्याचं देखील आता उघड झालं आहे. हा प्रकार परळमधील टाटा कॅन्सर रुग्णालय समोर आला असून कॅन्सरग्रस्त रूग्णांची रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर टाटा मेमोरियल रुग्णालयात कमिशन मिळवण्यासाठी गरीब रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेकडे पाठवले जात असल्याचं उघड झालं आहे.
Published on: Jul 19, 2023 09:10 AM
Latest Videos