मुंबईला जाताय तर ही बातमी खास आपल्यासाठी, गाडीला स्टाटर मारण्याआधी पाहा काय झालं मुंबई-पुणे महामार्गावर?

मुंबईला जाताय तर ही बातमी खास आपल्यासाठी, गाडीला स्टाटर मारण्याआधी पाहा काय झालं मुंबई-पुणे महामार्गावर?

| Updated on: Jul 24, 2023 | 7:28 AM

इर्शाळवाडीत घटना घडून चार दिवस ही होत नाहीत तोच राज्याच्या अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घडना सुरूच आहेत. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अनेकांचा जीव गेला. आता जे वाचले आहेत त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे.

लोणावळा, 24 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीकच्या इर्शाळवाडीत घटना घडून चार दिवस ही होत नाहीत तोच राज्याच्या अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घडना सुरूच आहेत. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अनेकांचा जीव गेला. आता जे वाचले आहेत त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. तर आता अशीच दरड कोसळण्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ घडली असून येथे भली मोठी दरड कोसळली आहे. ज्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना रात्री सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असून दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Published on: Jul 24, 2023 07:28 AM