आंबेनळी घाटात काय झालं की वाहतूक ताम्हिणी घाटातून फिरवली, पहा नेमकं काय झालय घाटात?

आंबेनळी घाटात काय झालं की वाहतूक ताम्हिणी घाटातून फिरवली, पहा नेमकं काय झालय घाटात?

| Updated on: Jun 28, 2023 | 1:41 PM

येथील आंबेनळी घाटातील वाहतूक ताम्हिणी घाटातून वळवण्यात आल्याचं तर त्याच मार्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीसांनी दिली आहे.

रायगड : पोलादपुरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. येथील आंबेनळी घाटातील वाहतूक ताम्हिणी घाटातून वळवण्यात आल्याचं तर त्याच मार्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीसांनी दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे घाटातील दोन्ही बाजूने होणारी वाहतुक थांबण्यात आली आहे. तर वाहतुक तात्पुरता बंद करण्यात आली होती. तर प्रवाशांनी माणगावकडून पुण्याकडे जाणाऱ्या ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तर रात्री 11 आणि सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अशा दोन वेळा दरडी कोसळल्या आहेत. सध्या JCB आणि कामगारांच्या दरड काढण्याचे काम सुरू असून पोलादपुर तहसिलदार कपिल घोरपडे घटनास्थळीच आहेत.

Published on: Jun 28, 2023 01:41 PM