मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर असाल तर महत्वाची बातमी; प्रवासा दरम्यान खाणं आणि पिण्यासाठी पाणी सोबत घ्याच

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर असाल तर महत्वाची बातमी; प्रवासा दरम्यान खाणं आणि पिण्यासाठी पाणी सोबत घ्याच

| Updated on: Jul 24, 2023 | 2:38 PM

राज्यातील अनेक घाट माथ्यावरील रस्ते हे आता जोरदार आणि मुसळधार पावसामुळे बंद होत आहेत. येथे कुठे रस्त्यावर पाणी येत आहे. तर कुठे झाडे पडत आहेत. तर कुठे दरडी कोसळल्यानं बंद होताना दिसत आहेत.

पुणे, 24 जुलै 2023 | राज्यात सुरू असणाऱ्या जोरादार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीला बसत आहे. राज्यातील अनेक घाट माथ्यावरील रस्ते हे आता जोरदार आणि मुसळधार पावसामुळे बंद होत आहेत. येथे कुठे रस्त्यावर पाणी येत आहे. तर कुठे झाडे पडत आहेत. तर कुठे दरडी कोसळल्यानं बंद होताना दिसत आहेत. अशी घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडली असून मुंबई- पुणे- एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. ज्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद झाल्या होत्या. तर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याजवळच ही दरड कोसळल्याने अनेक वाहने ही येथे थांबून होती. तर यावेळी दरड कोसळताना कोणतेही वाहन यात सापडले नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सध्या दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. मात्र आता प्राथमिक माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक २ तासांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे. तर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही चिवळे पॉइंटवरून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे.

Published on: Jul 24, 2023 02:07 PM