पर्यटन पंढरी लोणावळ्यात पर्यटकांची हाऊस फुल्ल गर्दी; भुशी धरणावर पर्यटकांचा उत्साह
सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना दिसत होत्या. तर अनेक छोटी मोठी धरण पुर्ण क्षमतेनं भरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारी पाण्याची चिंता आता मिटली आहे.
लोणावळा, 30 जुलै, 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना दिसत होत्या. तर अनेक छोटी मोठी धरण पुर्ण क्षमतेनं भरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारी पाण्याची चिंता आता मिटली आहे. तर मोठ मोठ्या धरणातही आता मुबलग पाणीसाठा झाला आहे. याचदरम्यान पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात विकेंडला आनंद लूटायला पर्यटक गर्दी करत आहेत. अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येथे येत असून लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तर कालपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पर्यटकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा भुशी धरणावरील पर्यटकांचा उत्साह…
Published on: Jul 30, 2023 10:14 AM
Latest Videos