वेद बारणे या चिमुरड्याच्या फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; फडणवीस यांनीही केले कौतुक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही दोस्ती तुटायची नाय असे बॅनरची जोरदार चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
मुंबई | 25 जुलै 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा (२२ जुलै) वाढदिवस पार पडला. मात्र यावेळी तो इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे त्यांनी रद्द केला. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचा वाढदिवस साजरा न करता इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रसांना मदत करा असे आव्हान केलं. त्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही दोस्ती तुटायची नाय असे बॅनरची जोरदार चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावेळी ही चर्चा एका चिमुरड्याची होत असून वेद बारणे या चिमुरड्याने फडणवीस यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्याचीच चर्चा होत आहे. वेद बारणे या चिमुरड्याने विधीमंडळात येत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवगर्जना म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर आपल्या खास शैलीत त्याने फडणवीस यांच्या कार्याचे कौतुकही केले. त्यानंतर फडणवीस यांनी देखील त्याचे कौतुक केलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे.