मुंबईच्या बीचवर जाताय थांबा! अरबी समुद्रात काय होतायत हालचाली? कसला दिला हवामान विभागानं इशारा?
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते वादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज आहे. सध्या अरबी समुद्राचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवडाअखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते वादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज आहे. सध्या अरबी समुद्राचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ झाली की कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ही यंत्रणा मजबूत होते. आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असते. तर यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आणि मुंबईमध्ये जोरदार अतिवृष्टी होऊ शकते.
Published on: Jun 05, 2023 10:54 AM
Latest Videos