समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; खासगी बस अपघात, 20 प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; खासगी बस अपघात, 20 प्रवासी जखमी

| Updated on: Jul 12, 2023 | 10:47 AM

ज्यात 33 पैकी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात बुलढाण्यात पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर झाला होता.

औरंगाबाद : काही दिवसांपुर्वी नागपुरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हलच्या खासगी बसला मोठा अपघात झाला होता. ज्यात 33 पैकी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात बुलढाण्यात पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर झाला होता. याच्या कटू आठवणी आजही ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 20 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात औरंगाबादच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर झाला. तर ट्रक आणि खासगी बस दरम्यान हा अपघात झाल्याचेहीव उघड होत आहे.

Published on: Jul 12, 2023 10:47 AM