Raigad Irshalwadi Landslide | इर्शादवाडीवर कालची रात्र ठरली काळरात्र, एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, पहा मन सून्न करणारा हा व्हिडिओ
रायगडमध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे येथे नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. तर ६ पैकी ४ नद्यानी धोक्याची पातळी गाठली आहे. तर गेल्या चार दिवसापासून रायगडमध्ये तब्बल 499 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
रायगड, 20 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. तर रायगडमध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे येथे नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. तर ६ पैकी ४ नद्यानी धोक्याची पातळी गाठली आहे. तर गेल्या चार दिवसापासून रायगडमध्ये तब्बल ४९९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रायगडमध्ये अनेक भागात दाणादाण उडालेली आहे. येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यादरम्यान रायगडमधील खालापूर येथील इर्शादवाडीवर काळानं काळ रात्र आणली आहे. येथे मोठी दुर्घटना झाली असून आदिवाशी वाडीवर दरड कोसळली आहे. ज्यामुळे ६० ते ७० घरे ही मातीच्या ढिगाऱ्याखाळी गाडली गेली आहेत. तर २०० च्या हून अधिक लोक मातीच्या खाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ती कशी झाली याचा हा व्हिडिओ….