ओडिशाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एक रेल्वेचा मोठा अपघात
या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. ज्यामुळे अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा अपघात पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये पहाटे 4 च्या सुमारास ओंडा स्टेशनजवळ झाला.
कोलकाता : देशात सगळ्यात मोठा अपघात हा ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झाला. त्यात किमान 1 हजार लोक जखमी तर 300 च्या जवळ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. ज्यामुळे अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा अपघात पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये पहाटे 4 च्या सुमारास ओंडा स्टेशनजवळ झाला. ज्यात दोन मालगाड्यांचा अपघात झाल्याने जीवितहानी टळली. मात्र या अपघातामुळे 12 डबे रुळांवरुन घसरले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या रुळांवरुन घसरलेले डबे हटवण्याचं आणि वाहतूक पूर्ववत करण्याचं काम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
Published on: Jun 25, 2023 09:48 AM
Latest Videos