अजित पवारांच्या देवगिरीत कसल्या हालचाली? कोणत्या भूकंपाची नांदी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल करताना भाकरीच फिरवली नाही तर नवीनच भाकरी तयार केल्या. त्यांनी पक्षाची धुरा कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात दिली. तर अजित पवार यांना कोणतीच जबाबदारी दिली नाही. यावरून ते नाराज असल्याचे बोलले गेले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल करताना भाकरीच फिरवली नाही तर नवीनच भाकरी तयार केल्या. त्यांनी पक्षाची धुरा कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात दिली. तर अजित पवार यांना कोणतीच जबाबदारी दिली नाही. यावरून ते नाराज असल्याचे बोलले गेले. त्यातच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी अजित पवार यांनी आपल्यास विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी करत पक्ष संघटनेची जबाबदारी द्या असे म्हणाले होते. त्यावरून त्यांची नाराजी थेट उघड झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या देवगिरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू आहे. त्यावरून प्रदेशाध्यक्ष पदावरून ही बैठक सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचा नियोजित दौरा रद्द केला आहे. तर ते शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचे कळत आहे. यासर्व घडामोडीत राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू हाय असा प्रश्न राज्यकीय वर्तुळात विचारला जात आहे.