अविश्वास ठराव आणला, सरपंच पद गेलं, पण पुन्हा सरपंच झाले, कसे?
सरपंच यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, त्या रिक्त पदावर पुन्हा तेच सरपंच म्हणू आले. कशी घडली ही ऐतिहासिक घटना, घ्या जाणून...
नाशिक : 7 ऑक्टोबर 2023 | दीड महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती प्रवर्गातून ते सरपंच झाले. पण, अविश्वास ठराव आणून त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले. मात्र. त्यांनी शासकीय पातळीवर लढा दिला. रिक्त जागेसाठी पोट निवडणुक झाली. याच पोटनिवडणुकीत ते पुन्हा सरपंच झाले. घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्यांना आणि अविश्वास दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच कैलास फुलमाळी यांनी चांगलीच चपराक दिली. दिड महिन्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत फुलमाळी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा त्यांची सरपंच म्हणून नियुक्ती केली. नांदगाव तालुक्यातील ही घटना ऐतिहासिक घटना मानली जाते. गमावलेले पद संविधानिकरित्या परत मिळाल्याने सरपंच फुलमाळी यांनी समाधान व्यक्त केलंय.
Published on: Oct 08, 2023 06:54 PM
Latest Videos