Special Report | थुंकण्यावरुन नवा वाद; का होतेय संजय राऊत यांच्या अटकेची मागणी?

| Updated on: Jun 03, 2023 | 7:39 AM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्यावरुन नवा वाद; संजय राऊत यांच्या अटकेची होतेय मागणी

मुंबई : कोणाचा पिक्चर चालणार, कोणाचा पोपट मरणार यानंतर आता थुंकण्यावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद रंगलाय. संजय शिरसाट यांच्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना संजय राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या या वर्तनामुळे त्यांच्या अटकेची मागणी शिंदे गटाकडून होतेय. टीकेला ज्या पद्धतीने संजय राऊत उत्तर देताय त्यावरून नवा वाद सुरू झालाय. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत आधी थुंकले नंतर प्रतिक्रिया दिली. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेच्या किरण पावसकर यांनी संजय राऊत यांना अटक व्हावी, अशी मागणी केलीये. तर आपण का थुंकलो यांचं स्पष्टीकरणही संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलंय. तर नुसतं अटकच नाही तर त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केलीये. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 03, 2023 07:39 AM
Special Report | ‘शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हेच खरे हिंदूराष्ट्र?’ सरसंघचालक भागवत यांचे वक्तव्य
Special Report : 1983 चा विश्वकप विजेता संघ महिला पैलवानांसोबत, केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन