Special Report | धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या आडनावावरून वादंग; काय पाटील प्रकरण आणि तिचं खरं...?

Special Report | धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या आडनावावरून वादंग; काय पाटील प्रकरण आणि तिचं खरं…?

| Updated on: May 27, 2023 | 8:43 AM

मराठा संघटना समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये असे सांगत इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली.

मुंबई : प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नृत्यांगना गौतमी पाटील हि आता नव्या वादामुळे चर्चेत आहे. तिच्या पाटील आडनावावरून वादाला तोंड फुटलं आहे. मराठा संघटना समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये असे सांगत इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली. तर यावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर यावरून जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गौतमी पाटीलचं समर्थन करत तिला पाठिंबा दर्शवला. तसेच भिम आर्मीने देखील पाठिंबा दिला आहेत. तर गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील हे नसून ते चाबूकस्वार असे आहे. त्यावरून सुरू असलेल्या वादावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 27, 2023 08:43 AM