‘सहा बॉलमध्ये एखादा नो बॉल तसे…; शिंदे म्हणजे एका हत्तीची…’ बच्चू कडू नेमक काय म्हणाले?
अयोध्या जाऊन आम्ही प्रभु रामाचे दर्शन घेणार आहोत. सोयाबीन, कापूस, उसाचा प्रसाद चढवुन आम्ही मागणी करणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या जिवाचं बलिदान देत आपलं रक्त सांडवले त्यांच स्मरण राहावं म्हणून मेरी माटी मेरा खून असा अभियान आम्ही राबवत आहोत.
नागपूर : | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा हा एका जातीचा किंवा धर्माचा विषय नाही तर हा एक पद आहे.. ओबीसी मध्ये काही अडचण न आणता काही कोटा वाढवून देता येत असेल तर द्यावा. आक्रमक स्वरूप घेऊन समोर कसे जाता येईल ही रणनीती शिवाजी महाराजांची होती. डायरेक्ट हल्ला करण्यापेक्षा थोडं टप्प्याटप्प्याने गेलं तर चांगलं राहील. अशी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आंदोलन नेले तर बरं होईल असं मला वाटतं, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. संजय राऊत हे सहा बॉलमध्ये एखादा नो बॉल व्हावा म्हणून गुगली टाकत असतात. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही असाच नो बॉल टाकला आहे. त्याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे एका हत्तीची ताकत आहे. ते काही मागे हटणार नाही. राज्यात जे निगेटिव्ह वातावरण सध्या तयार होतोय त्याला पॉझिटिव्ह करण्यात शिंदे साहेबांचा हात आहे. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री कसे असावे हे त्यांनी जनतेशी संवाद साधून एका वर्षात दाखवून दिले असेही आमदार कडू म्हणाले.