Special Report | लाखोंचा पगार घेणारे आमदार अत्यल्प उत्पन्न गटात कसे? काय आहे? काय आहे म्हाडाची पॉलिसी?
मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. ‘सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे’ असे धोरण असलेल्या म्हाडाच्या सोडतीची जाहिरात पाहून सर्वसामान्यांना धक्का बसला आहे.
मुंबई : मुंबईत परवडणाऱ्या दरात स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी सर्वसामान्य म्हाडा सोडतीची प्रतीक्षा करत असतात. अखेर यासाठी जाहिरात आली आणि अनेकांची पळापळ सुरू झाली. पळापळ मुंबईतील हक्काच्या घरासाठी. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. ‘सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे’ असे धोरण असलेल्या म्हाडाच्या सोडतीची जाहिरात पाहून सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. कारण अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात आमदारांसाठी आरक्षण ठेवले आहे. यावरून सध्या चांगलाच गदारोळ होताना दिसत असून म्हाडाकडून अजून कोणतेही स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे आमदारांना महिना काठी 2 लाख 80 हजार पगार मिळतो. तरीदेखील त्यांचा अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात समावेश करण्यात आल्याने आता म्हाडाचे घरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट