Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये थरार; प्रवासी बस पुरात अडकली, प्रवाशांना उतरवण्यासाठी आणला जेसीबी

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये थरार; प्रवासी बस पुरात अडकली, प्रवाशांना उतरवण्यासाठी आणला जेसीबी

| Updated on: Jul 22, 2023 | 2:54 PM

गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे कोटा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. मात्र आज अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ज्यात प्रवाशांनी भरलेली बस नदीच्या प्रवाहातच अडकली.

बिजनौर, 22 जुलै 2023 : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील एक रोमांचकारी व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. येथे एक प्रवासी बस नदीच्या पुरात अडकलेली दिसत आहे. तर ती पलटी होऊ नये म्हणून क्रेन आणि प्रवासी उतरविण्यासाठी जेसीबी आणल्याचे समोर येत आहे. तर लोक आपला जीव वाचविण्यासाठी बसच्या खिडकीतून उतरत जेसीबीच्या बकेटमध्ये बसताना दिसत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील असून हरिद्वार-बिजनौर मार्गावरील आहे. तर ही बस कोटा नदीच्या जोरदार प्रवाहात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे कोटा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. मात्र आज अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ज्यात प्रवाशांनी भरलेली बस नदीच्या प्रवाहातच अडकली. यानंतर बस आणि प्रवाशांच्या मदतीसाठी क्रेनसह जेसीबी आणण्यात आला.

Published on: Jul 22, 2023 02:54 PM