Lal baugcha Raja | नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी लालबागच्या राजाच्या सेवेत NDRF

Lal baugcha Raja | नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी लालबागच्या राजाच्या सेवेत NDRF

| Updated on: Sep 02, 2022 | 4:33 PM

Lal baugcha Raja | नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी NDRF चं पथक लालबागच्या राजाच्या सेवेत दाखल झालं आहे.

Lal baugcha Raja | नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) लालबागच्या राजाच्या सेवेत दाखल झालं आहे. लालबाग राजाच्या (Lal baugcha Raja) मैदानाशेजारील शाळेत ही पथक थांबलं आहे. कसल्याही प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या काळात मंडळाने हाक दिल्यास हे पथक त्वरीत धाऊन जाणार असल्याची माहिती, पथकाचे इन्स्पेक्टर अशोक कुमार यांनी दिली. दुर्घटना घडल्यास शुन्य मिनिटात(Short Time) ही टीम घटनास्थळी असेल. या मंडळाच्या जवळून एक रहदारीचा पूल आहे. त्याठिकाणीही घटना घडू शकते. अशावेळी सतर्कतेच्या आणि मदतीच्या (Help) दृष्टीने ही टीम काम करणार आहे. या पथकात जवळपास 30 प्रशिक्षित कर्मचारी आहेत. एवढेच नाही तर नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी जी यंत्र आणि यंत्रणा आवश्यक आहे, साहित्य गरजेचे आहे, ते सर्व या टीम सोबत आहे. या टीमकडे लालबागचा राजा आणि आजुबाजूच्या परिसरातील घटनांचा सामना करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Published on: Sep 02, 2022 04:33 PM