रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; या मार्गावर 21 जून रोजी असणार तीन तासांचा मेगाब्लॉक
रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. तर मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तास मेगाब्लॉक असल्याने त्याचा थेट परिणामा हा वेळापत्रकावर होणार आहे.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर 21 जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. तर मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तास मेगाब्लॉक असल्याने त्याचा थेट परिणामा हा वेळापत्रकावर होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या तीन गाड्या या नियंत्रित केल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा-रत्नागिरी विभागादरम्यान नियंत्रित केली जाईल. तर तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस उडपी-कणकवली विभागादरम्यान तीन तासांसाठी थांबवली जाईल. त्याचबरोबर सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी रोड, कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.