शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी ५०० नाही तर ‘इतका’ लागणार टोल, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रूपयांचा टोल प्रस्तावित केला होता. याच प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या टोलसंदर्भात मोठा निर्णय झालाय. बहुप्रतीक्षीत शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं काम पूर्ण झालं
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : भारतातील सर्वात लांब पूल असणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे नामकरण ‘अटल सेतू’ असे करण्यात आले आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या वतीने याचे बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रूपयांचा टोल प्रस्तावित केला होता. याच प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या टोलसंदर्भात मोठा निर्णय झालाय. बहुप्रतीक्षीत शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं काम पूर्ण झालं असून आता या सागरी सेतूसाठी २५० रुपये टोल आकारला जाणार आहे. सुमारे २१ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या बहुचर्चित ‘शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’वरून एकेरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना तब्बल ५०० रुपये तर मोठ्या वाहनांना ८०० पासून तीन हजार रुपयांपर्यंत पथकर (टोल) भरावा लागणार असल्याची चर्चा होती. मात्र आता यावर आज, गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालाय.