साता समुद्रपार असलेलं जपान शहर आलं थेट महाराष्ट्रातील या जिल्ह्यात? काय आहे प्रकरण?
नंदूरबार जिल्ह्यातील सध्या एका फलकामुळे अनेकांना हे गाणं नक्की आठवत असेल. येथी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे साता समुद्रपार असलेलं जपान हे शहर चक्क नंदुरबार जिल्ह्यात आलं आहे.
नंदूरबार, 02 ऑगस्ट 2023 | दिवंगत गायक किशोर कुमार यांचे एक गाणं खूप प्रसिद्ध आणि अनेकांच्या मुखात असणारे आहे. हे गाणं हम थे, वो थी, वो थी, हम थे, और समा था रंगीन, समझ गए ना, जाते थे जपान पहुँच गए चीन… असचं काहीस आपल्या महाराष्ट्रात देखील झालं आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सध्या एका फलकामुळे अनेकांना हे गाणं नक्की आठवत असेल. येथी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे साता समुद्रपार असलेलं जपान हे शहर चक्क नंदुरबार जिल्ह्यात आलं आहे. त्यामुळे याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. तर याबाबत माहिती अशी की, बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. या दिशादर्शक फलकामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचं गाव असल्याचं फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना वाटू लागला आहे की जपान हे गाव कुठे आहे? याच्या ते शोध घेत आहेत. परंतु बांधकाम विभागाकडून ही चूक झाली असून जपान हे गाव नसून जमाना हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने लवकर हा फलक दुरुस्ती करून लावण्यात यावे अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.