लालबागच्या राजाच्या दर्शधनासाठी धक्काबुक्की…
हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी पोलिसांनी मधस्थी करत वाद मिठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेश दर्शनासाठी आलेल्या महिलेने महिला सुरक्षा रक्षकालाही धक्काबुकी केली.
गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी लागली आहे. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या दर्शनाशासाठी भाविकांना आता बाहेर सोडताना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांबरोबर आज पहिल्याच दिवशी जोरदार वादावादी झाल्याचा प्रकार घडला. एक महिला भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी आलेली असताना त्यांना रांगेतून सोडण्यावरुन महिलेने महिला सुरक्षारक्षकाबरोबर जोरदार वाद झाल्याचे दिसून आले. यावेळी महिला सुरक्षा रक्षकाच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रकार घडला. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी पोलिसांनी मधस्थी करत वाद मिठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेश दर्शनासाठी आलेल्या महिलेने महिला सुरक्षा रक्षकालाही धक्काबुकी केली, त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसताच क्षणी पोलिसांनी हा वाद मिठवून महिला बाहेर जाण्यास सांगितले.