सेल्फी काढणं पडलं महागात, पाहा नदीत पडलेल्या महिलेला वाचवण्याचा थरारक व्हिडीओ…
पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हाच सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही असाच प्रकार घडला आहे.
पालघर, 31 जुलै 2023 | पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हाच सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही असाच प्रकार घडला आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला मोठा पूर आला असून डहाणूतील एक दांपत्य हे वाघाडीतील भीम बांध येथे पर्यटनासाठी आल होत. मात्र महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट दगडावरून नदीत कोसळली. सुदैवाने येथे असलेल्या डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारून नदीच्या प्रवाहात पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढल.
Published on: Jul 31, 2023 07:45 AM
Latest Videos