Parbhani Marathon Running Lady Viral | साडी नेसलेल्या महिलेनं मॅरेथॉन स्पर्धा जिंकली, व्हिडीओ व्हायरल
विशेष म्हणजे मंगल यांनी या स्पर्धेसाठी कुठलीही पूर्वतयारी केली नव्हती. शिवाय त्यांच्या पायात बूट किंवा चप्पल सुद्धा नव्हती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगल यांनी मॅरेथॉन जिंकली.
परभणी : पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत साडी नेसलेल्या 45 वर्षीय शेतकरी गृहिणीने धो-धो धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकत दहा हजार रुपयाचा पारितोषिक सहित उपस्थितांचे मने जिंकली. मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. मंगल आव्हाड असं या गृहिणीचं नाव असून, सोनपेठ नगरपालिकेकडून स्वातंत्रताच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत या गृहिणीने भाग घेतला होता. विशेष म्हणजे मंगल यांनी या स्पर्धेसाठी कुठलीही पूर्वतयारी केली नव्हती. शिवाय त्यांच्या पायात बूट किंवा चप्पल सुद्धा नव्हती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगल यांनी मॅरेथॉन जिंकली. त्यामुळे जिल्हाभरातून मंगल यांचं कौतुक होत आहे.

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली

नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका

सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
