Aaditya Thackeray : खरे मुख्यमंत्री कोण, हे सर्वांना कळालंय, आदित्य ठाकरेंची टीका
'राज्यात जे मंत्रिमंडळ स्थापन झालंय. त्या शिंदे- देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात खरे मुख्यमंत्री कोण, हे सर्वांना कळालं आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात महिला, मुंबईकर आणि अपक्षांना कुठेही स्थानी नाही.
मुंबई : आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. आज पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) पहिला दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यात जे मंत्रिमंडळ स्थापन झालंय. त्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खरे मुख्यमंत्री कोण आहेत, हे सर्वांना कळालं आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात महिला, मुंबईकर आणि अपक्षांना कुठेही स्थानी नाही. जे निष्ठाव शिंदे गटात (Eknath Shinde) गेले होते. त्यांना देखील कुठेही स्थान नाही, अशी टीका माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिंदे गटासह भाजपवर केली आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
Published on: Aug 17, 2022 01:13 PM
Latest Videos