Aaditya Thackeray : शिंदे गटाचे आमदार दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलतात, आदित्य ठाकरेंचा आरोप
'शिंदे गटाचे आमदार दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत. त्यांच्यातील अनेकांना दिल्लीपर्यंत जावं लागतयं. आता तर गल्लीतील लहान लहान मुलांनाही 50 खोके माहीत झाले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
मुंबई: शिवसेना (shivsena) नेते (shivsena) आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. ते म्हणाले की, ‘शिंदे गटाचे आमदार दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत. त्यांच्यातील अनेकांना दिल्लीपर्यंत जावं लागतयं. आता तर गल्लीतील लहान लहान मुलांनाही 50 खोके माहीत झाले आहेत. या मंत्र्यांचा काहीच अभ्यास नाही. ते सभागृहात उघडे पडत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला, असंही ठाकरे यावेळी म्हणाले तर यावेळी त्यांनी एक अट घातली. ‘आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी अटही आदित्य यांनी ठेवली आहे. तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो. सर्व मिळून निवडणुका लढू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. आम्हाला शिव्या द्या. मंत्रीपद मिळतील आमदारांना,’ अशी टीकाच आदित्य ठाकरे यांनी केली आहे.