Aaditya Thackeray : ही लोकशाही आहे ठोकशाही नाही, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आपण बघतो आहे. आम्ही सर्व एकजुटीनं एकत्र आलो आहेत. ही लोकशाही आहे ठोकशाही आहे.' अधिक वाचा...
मुंबई : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आपण बघतो आहे. आम्ही सर्व एकजुटीनं एकत्र आलो आहेत. ही लोकशाही आहे ठोकशाही आहे,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे. विधिमंडळाबाहेर विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली जातेय. हे अधिवेशन देखील वादळी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप पहायला मिळताय. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षानं एकत्र येऊन दाखवलेली ताकद बघायला मिळतेय. यावेळी आरोप-प्रत्यारोप होताय.
Published on: Aug 17, 2022 12:24 PM
Latest Videos