Aaditya Thackeray : तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो, सर्व मिळून निवडणुका लढू-आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो, सर्व मिळून निवडणुका लढू-आदित्य ठाकरे

| Updated on: Aug 25, 2022 | 12:31 PM

'तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो. सर्व मिळून निवडणुका लढू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. वाचा....

मुंबई:  शिवसेना (shivsena) नेते (shivsena) आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. ‘मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. पण आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी अटही आदित्य यांनी ठेवली आहे. तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो. सर्व मिळून निवडणुका लढू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी ही अट ठेवली खरी पण याला शिंदे गट (shinde camp) कसं उत्तर देणाक याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, 40 वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिलं. आमच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. आम्हाला शिव्या द्या. मंत्रीपद मिळतील आमदारांना,’ अशी टीकाच आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Aug 25, 2022 12:31 PM