आदित्य ठाकरेंचं सुहास कांदेंना प्रत्युत्तर!
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी भेटण्याचं आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, असं ते म्हणालेत.
नाशिक: आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत. त्यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते. दुपारी ते मनमाड येथे शिवसैनिकांच्या (Shivsainik) मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात ते सुहास कांदे यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यावर केलेल्या आरोपांवरही ते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी भेटण्याचं आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, असं ते म्हणालेत.
Published on: Jul 22, 2022 12:32 PM