Ramdas Athawale | ‘ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नावं एकनाथ शिंदे’, रामदास आठवले यांच्या कवितेने पिकली खसखस
Ramdas Athawale | tv9च्या बाप्पाची आरती आणि दर्शन आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतले. यावेळी त्यांनी अनेक शाब्दिक टोले लगावले.
Ramdas Athawale | ‘ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नावं एकनाथ शिंदे’, रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या कवितेने खसखस पिकली. tv9च्या बाप्पाची आरती आणि दर्शन आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतले. यावेळी त्यांनी अनेक शाब्दिक टोले लगावले. राज्यात सुख शांती नांदू देत. सर्वांचे कल्याण कर अशी प्रार्थना त्यांनी बाप्पा चरणी केली. बंडाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनाला जबरदस्त धक्का दिलाा. महाविकास आघाडीचे सरकार घरी गेले आणि शिवसेना आणि भाजपचं सरकार सत्तेत आले आहे. हे सरकार पुढील अडीच वर्षे ताकदीने सरकार चालवतील, एवढंच काय त्यानंतरची पाच वर्षे हे सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एक पद मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच खाते कोणते द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असे त्यांनी सांगितले.