नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी?; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्वासन दिलं, म्हणाले…
Abdul Sattar : अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशात शेतकरी हवालदिल झालाय. अशात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे.
नाशिक : अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. अशात शेतकरी हवालदिल झालाय. सरकारी मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अशात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. “वेगवेगळा दिवशी गारपीठ आणि पाऊस झाल्याने पूर्ण पंचनामे करून पैसे कसे देता येतील, याचं नियोजन करू. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करायला सरकार कमी पडणार नाही. आता कर्जमाफी होणार नसून त्यापेक्षा वेगळा काय निर्णय घेता येतील तो विचार करायचा आहे. अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्याला विम्याच शेतकरी 1 रुपया भरणार आणि उर्वरित सरकार भरणार आहे. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना हातभार कसा लावता येईल त्याचा सरकार नक्कीच विचार करणार आहे, असं सत्तार म्हणालेत.
Published on: Mar 22, 2023 04:09 PM
Latest Videos