‘नंबर 2 चे पप्पू सिल्लोडला.. बघायला या’, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया काय?
आदित्य ठाकरेंनी सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मेळावा आयोजित केला आहे.
औरंगाबादः ज्यांनी पप्पू (Pappu), नंबर २ चे पप्पू, छोटा पप्पू म्हणून खिल्ली उडवली. त्याच कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मतदार संघात आता आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार पप्पू या नावाने संबोधत आहेत. पण कुणी काहीही म्हणा, तुम्हाला आम्ही पुरून उरणार, अशी प्रतिक्रिया या आधीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे गटातील 40आमदारांच्या मतदार संघात मेळावे, दौरे आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे यांना वारंवार आव्हान देणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावर अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधी पक्षांनी कोणतंही मिशन हाती घेतलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्हीही या सिल्लोडला हा मेळावा पहायला. येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरेंचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.