माझ्याविरोधात खेळ सुरु, मी खेळ उलटवणार, अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

“माझ्याविरोधात खेळ सुरु, मी खेळ उलटवणार”, अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

| Updated on: Jun 14, 2023 | 8:39 AM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या पथकाकडून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता कृषीमंत्र्यावर आता टीका केली जात आहे. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धाराशिव : कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या पथकाकडून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता कृषीमंत्र्यावर आता टीका केली जात आहे. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, नियमानुसार पथके तयार केली आहेत रेड टाकल्या आहेत, शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजू घेऊ नका, बोगस बियाणे असतील, बियाण्यांची साठवणूक असेल आणि चढ्या दराने माल विकत असतील तर ते कोणत्याही प्रकारे खवपून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, माझ्या विरोधात टीका करण्याचा हा खेळ सुरू आहे पण टीका करणाऱ्यांवरच मी हा खेळ उलटवणार आहे. जो माझ्याबाबती जी व्यक्ती खेळ करत आहे त्याचे नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

Published on: Jun 14, 2023 08:39 AM